Headlines

सफाई कामगारांना विविध शासकीय योजनांची माहिती:चांदवड नगरपरिषदेत नशामुक्तीची सामूहिक शपथ‎




नगरपरिषदेतील सफाई कामगारांना कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासह व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्या वतीने आयोजित या शिबिरात समतादूत अर्चना किरोते यांनी बार्टी व समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावेळी सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली. तसेच, मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्ती अभियाना’अंतर्गत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. व्यसनमुक्त जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागूल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, स्वच्छता समिती सभापती डॉ. जीवन देशमुख, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, कार्यालय अधीक्षक आदित्य मुरकुटे, लिपिक संजय क्षीरसागर, यशवंत बनकर, बाबुलाल थोरात यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि सफाई कामगार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *