Headlines

पारंपारिक वाद्यांचा गजर अन् मिरवणुकीने नेवासेत दसऱ्याचा उत्साह:शहरातील जामदार मळ्यात पारंपरिक दसरा सोहळ्याला हजारो नागरिकांची उपस्थिती‎



शहरातील खुपटी रस्त्यावरील जामदार मळ्यात विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. नेवासा शहरातील जामदार मळ्यातील शमीच्या झाडाखाली दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची जुनी परंपरा आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ.

.

दसरा उत्सवाची सुरुवात धनगर गल्लीतील मारुती मंदिरापासून वीरभद्र-बिरोबाच्या मानाच्या झेंडाकाठीच्या मिरवणुकीने झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “येळकोट येळकोट जय मल्हार’ जयघोषात निघालेल्या मिरवणुकीचे तलाठी कार्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले. मंडलाधिकारी अनिल गव्हाणे व डॉ. घुले यांच्या हस्ते मानाच्या झेंडाकाठीचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीत पत्रकार सुधीर चव्हाण, दसरा उत्सव कमिटीचे रवींद्र शेंडे, तलाठी कार्यालयाचे राहुल चव्हाण, सुनील गायकवाड, नगरसेवक दिनेश व्यवहारे, श्रीमंत कान्हू दाणे, आबासाहेब बुचुडे, नगरसेवक जालिंदर गवळी, बाबासाहेब भगत, अण्णासाहेब बुचुडे, शिवाजी वैद्य, गोरख बुचुडे, अशोक गवळी यांच्यासह समाजबांधव व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणूक सीमोल्लंघनाचे पारंपरिक स्थान असलेल्या जामदार मळ्यात पोहोचल्यानंतर धनगर समाजाच्या वीरभद्र झेंडाकाठीसह माळी वस्तीवरून आलेल्या कान्होबाच्या मानाच्या झेंडाकाठीचे सुवासिनींनी पंचारतीने औक्षण करून पूजन केले. दसरा उत्सव कमिटी तसेच जामदार व गायकवाड परिवाराच्यावतीने स्वागत करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पाने देत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या उत्सवातील विशेष आकर्षण ठरले ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनागोंदी जमाखर्चाच्या ताळेबंदाचे सार्वजनिक वाचन. महसूल विभागाचे मंडलाधिकारी अनिल गव्हाणे यांनी रामायणाचार्य हभप नंदकिशोर महाराज खरात, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे आणि नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पारंपरिक जमाखर्चाचे चावडी वाचन केले. यंदाचा अनागोंदी जमाखर्च एक कोटी पन्नास लाख एक रुपया इतका मांडण्यात आला.

या अनागोंदी जमाखर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रत्यक्ष शासकीय आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद नसून नागरिकांच्या अपेक्षा, शहराच्या विकासाच्या गरजा आणि संभाव्य कामांचा प्रतीकात्मक हिशेब असतो. त्यामध्ये अंदाजित जमा दाखवून संपूर्ण रक्कम लोकहिताच्या विकासकामांवर खर्च झाल्याचे मांडले जाते. यंदाच्या ताळेबंदात शहरातील आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सेवा आणि इतर नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *