Headlines

मुळा उजव्या कालव्यातून होतोय पाण्याचा अपव्यय:पाण्याचे आवर्तन तातडीने बंद करण्याची मागणी‎




मुळा उजव्या कालव्यातून दोन महिन्यांपासून शेतीसाठी आवर्तन सुरू झाले आहे. परंतु रोटेशन बंद करण्याची मागणी केली जात असताना पाटबंधारे विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याने पाणी बचतीचे धडे देणाऱ्या मुळा पाटबंधारे विभागाकडून पाटपाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने अक्षरशः दुष्काळात पाण्याची उधळपट्टी आता तरी थांबवा अशी मागणी करत पुढे काय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा उजवा कालवा गेल्या दोन महिन्यांपासून अविरतपणे चालू आहे. यावर्षी मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस काहीच नसल्याने पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. आता सर्वत्र साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्याने पाणी कोणी घेत नाही त्यामुळे कालव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाट पाण्यावर वरिष्ठांचे काही नियोजनावर आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच आवर्तनाचे योग्य नियोजन केले असते तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काही पाणी उपयोगात आले असते. पंरतु भर दुष्काळात पाटबंधारे विभाग या पाणी उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी बोलतात त्यामुळे तातडीने आवर्तन बंद करावे व यापुढील पाण्याचे नियोजन जाहीर करावे अशी मागणी देडगाव, रस्तापूर, कौठा, चांदा, फत्तेपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *