Headlines

गणरायाला निरोप:गतवर्षापेक्षा तीन तास अधिक लागले, नियाेजन काेलमडले‎; मिरवणूक चालली 21 तास 46 मिनिटे




विघ्नहर्ता गणरायाची मुख्य विसर्जन‎मिरवणूक शुक्रवारी सकाळी ११‎वाजता मनपाच्या मानाच्या‎गणपतीपासून सुरू झाली. यंदा २१‎तास ४६ मिनिटे ती चालली. शनिवारी‎सकाळी ८.४६ वाजता शेवटच्या‎गणपतीचे विसर्जन झाली. गतवर्षी ही‎मिरवणूक १८ तास २५ मिनिटे‎चालली. यंदा मिरवणुकीला तीन‎तासांहून अधिक वेळ लागला.‎ यंदा मिरवणुकीत शहरातील ६७‎गणेश मंडळे सहभागी झाली होती.‎शुक्रवारी सकाळी ११ वाजता‎मनपाच्या मानाच्या गणपतीची‎महाआरती करून मिरवणुकीला‎सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रोहन‎घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने,‎पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,‎महापौर दीपमाला काळे, उपमहापौर‎मनोज चौधरी आणि स्थायी समिती‎सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील‎यांच्यासह अनेक नगरसेवक‎उपस्थित होते. यंदा अधिकारी आणि‎कर्मचाऱ्यांच्या विशेष ड्रेसकोडने लक्ष‎वेधून घेतले. पारंपरिक ढाेल-ताशांचा गजर‎ शिवगर्जना ढोल-ताशा पथकासाेबत आयुक्त,‎महापौर व नगरसेवकांनाही नृत्याचा मोह आवरता‎आला नाही; त्यांनी दिलखुलासपणे ठेका धरत‎मिरवणुकीत रंगत भरली. नगरसेविका रजियाबी‎अमजद खान यांनी महापौरांसोबत फुगडी खेळली.‎रात्री मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळेंसह‎महापौर दीपमाला काळे लेझिम खेळले. वज्रेश्वर‎देवी गणेश मंडळाने आणलेल्या उज्जैनच्या डमरू‎पथक तर महाराणा प्रताप मंडळाच्या केरळी वाद्य‎कला समितीचे केरळी नृत्य पथक लक्षवेधी ठरले.‎ देखावे, पथनाट्यातून प्रबोधन‎ त्रिमूर्ती चौक, आझाद क्रीडा मंडळ,‎गणेशवाडी, सिंधी सम्राट मंडळ, कालिका मित्र‎मंडळ, कांचनगरच्या राजाने लक्ष वेधले.‎
महर्षी व्यास युवाशक्ती संस्थेने शेतकरी‎आत्महत्येचा देखावा आणि ‘लहान मुलांचे‎मोबाइलचे व्यसन” हे पथनाट्य सादर केले.‎
हिंदवी स्वराज्य, पेशवा, शिवगंध, महाबळी‎आणि शिवसूर्य या ढोल-ताशा पथकांच्या तालावर‎तरुणाई या गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकली.‎
श्रीकृष्ण मंडळाने लाठी-काठीच्या कसरती‎सादर केल्या. शिवाजीनगर मंडळाच्या लेझिम‎पथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले हाेते.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *