![]()
नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या तणावातून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथील एका ३३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी निटूर शिवारात घडली. अंकुश रमेश काळे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. अंकुश काळे यांची निटूरच्या कामशेतवाडी शिवारातील गट क्रमांक १२ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यात त्यांनी उसाची लागवड केली होती. मात्र, पावसाची ओढ आणि बोअरवेलचे पाणी आटल्याने पीक हातचे जाण्याची चिन्हे होती. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले बँक व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेत ते होते. शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे डोंगरगाव बोरी आणि निटूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कर्जाचा ताण आणि समुपदेशनाची गरज सलगचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. पीक हातातून गेल्यानंतर कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने शेतकऱ्यांवरील मानसिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत कर्जविषयक मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
Source link
उसाचे पीक करपल्यामुळे निटूर शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:दोन बँकांतील कर्जाच्या चिंतेतून नैराश्य आल्याचा नातेवाईकांचा दावा