![]()
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १० वाजता ते परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील. शेतकऱ्यांशी संवाद साधतील.या दौऱ्यात शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते आमदार अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. टाकळी कुंभकर्ण येथील पाहणीनंतर आदित्य ठाकरे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील.
Source link
परभणी:आज आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी साधणार संवाद