Headlines

विसर्जन सोहळा:पिंपळगावमध्ये 26 मिरवणुका; 11 तास चालला विसर्जन सोहळा




‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पिंपळगाव शहर व परिसरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात एकूण २६ गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत उत्साहात काढण्यात आल्या. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या विसर्जन मिरवणुका रात्री १० वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल ११ तास अखंडपणे सुरू होत्या. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने ५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती; तर कादवा नदीतीरावर सुरक्षेसाठी तराफा उभारण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाचे चोख नियोजन आणि गणेशभक्तांच्या शिस्तीमुळे संपूर्ण मिरवणूक सोहळ्यात कोणतीही अनुचित घटना न घडता विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत व निर्विघ्नपणे पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *