![]()
तालुक्यातील गलवाडा येथे बुधवारी (दि.२२) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची गावभर मिरवणूक काढण्यात आली होती. शिवाजीनगर (प्लॉट) येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक गलवाडा गावात पोहोचली. गावात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीनंतर सायंकाळी शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लहान मुलामुलींनी आकर्षक देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमामुळे गावात उत्साह आणि ऐतिहासिक अभिमानाची भावना जागृत झाली. कार्यक्रमासाठी अनिल इंगळे, आनंदा इंगळे, जीवन पाटील, किरण इंगळे, सुनील सैदाणे, पंजाबराव कुनगर, दीपक सोनवणे, अक्षय औरंगे, ओम इंगळे, रमेश चक्के, यश देशमुख, ऋषिकेश देशमुख, निलेश इंगळे, रणवीर इंगळे, शुभम पाटील, गोपाल पाटील, रोहित देशमुख, विजय सोनवणे, योगेश इंगळे आदींनी पुढाकार घेतला होता.
Source link
गलवाडा येथे शिवजयंती उत्साहात:ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक