Headlines

‘गूड टच, बॅड टच’ व्हिडिओतून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे:चांदवडच्या नेमिनाथ जैन विद्यालयात जनजागृतीपर उपक्रम‎




विद्यार्थिनींना चांगला व वाईट स्पर्श ओळखता यावा, तसेच अनुचित घटना घडल्यास धैर्याने परिस्थितीला सामोरे जाता यावे, या उद्देशाने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा मोहिमेंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी ‘गूड टच आणि बॅड टच’ याबाबत माहिती देणारा व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुलींना विविध अनुभवांना सामोरे जावे लागते. अशा वेळी चांगला व वाईट स्पर्श ओळखण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, हा कार्यक्रमाचा उद्देश होता. अनुचित घटना घडल्यास मनात भीती न बाळगता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, तसेच गरज भासल्यास कुठे व कशी मदत मागावी, याबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. शिक्षिका मंजुषा ओस्तवाल, संगीता चव्हाण, सोनाली भामरे, शिल्पा चोरडिया, वैशाली भामरे, स्नेहा सूर्यवंशी, खैरनार यांनी कार्यक्रम यशस्वी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *