![]()
जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवार ३० रोजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव काही ठिकाणी आगळ्यावेगळ्या, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व खासगी शाळांमध्ये रां
.
महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेशासह नोटबुक, मोफत वाहन सेवाही देण्यात आली. प्रायोजकांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना सायकल मनपा शिक्षण सभापती अॅड. प्रीती रेवणे यांनी वितरित केल्या. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रायोजक शोधून त्यांना मोफत नोटबुक देण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पायांचे रंगीत ठसे कागदावर घेतले. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत स्कूल व्हॅन सेवा प्रायोजकांच्या माध्यमातून देण्यात आली.
चांदूरवाडीत जेसीबीतून पुष्पवृष्टी चांदूर रेल्वे | जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, चांदूरवाडी येथे तालुकास्तरीय शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रथमच जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळेच्या आवारात उभारलेल्या जेसीबीमधून गावकऱ्यांनी इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावतीचे उपायुक्त प्रवीण मानकर, उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, गटविकास अधिकारी राणी माळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय खारकर, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, गटसमन्वयक मंगेश उल्हे, उपसरपंच सोनू शेख, विषयतज्ज्ञ निखिल दानापूरकर, विवेक राऊत, तसेच रेखा वडतकर, सचिन वावरकर, नंदकिशोर धरणे, अस्मिता गिरी यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विषय शिक्षक सचिन वावरकर यांनी केले.