Headlines

ट्रॅव्हल्सने आलेला 5 हजार किलो खवा धुळ्यात जप्त:एफडीएची कारवाई; अहमदाबादचे 3 जण ताब्यात




अन्न व औषध प्रशासनाने अहमदाबाद-अकोला लक्झरी बसमधून १६ लाख ५२ हजार १०० रुपये किंमतीचा ५,३८५ किलो संशयास्पद खवा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एफडीएचे पथक आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त सापळा रचून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मोराणे हद्दीत, साक्री रस्त्यावरील हॉटेल बालाजीजवळ मंगळवारी सकाळी ६ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी बसमधील संशयित जगदीश मानजी पाटीदार, चालक महेंद्रसिंग परबतसिंग राठोड आणि क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) यांना ताब्यात घेतले आहे. जप्त खवा खराब होऊ नये यासाठी तो तात्काळ टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे सुरक्षित हलवण्यात आला आहे. पथकाने यातील १३ प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या ‘वेलकम ट्रॅव्हल्स’च्या लक्झरी बसमधून (एमपी-४४, झेड एफ-७२१४) मोठ्या प्रमाणावर माव्याची वाहतूक होत असल्याची खबर पथकाला मिळाली होती. या १३ ब्रँड्सचा खवा प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदी), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझर्ट (नंदी), प्रीमियम डेझर्ट (मीरा). गुजरात ते विदर्भ सिंडिकेट अहमदाबादहून अत्यंत स्वस्त दरात भेसळयुक्त/सबस्टँडर्ड खवा तयार करून तो महाराष्ट्रातील अकोला, अमरावती आणि विदर्भातील बाजारात सणासुदीच्या काळात चढ्या दराने विकण्याचे हे मोठे ‘सिंडिकेट’ सक्रिय असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. चालक अन् क्लिनरसह तिघेही अहमदाबादचेच रहिवासी आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *