![]()
एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली. दरम्यान, सक्षम व सधन शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यकता नसल्यास ५ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत परत करावेत, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावर ग्रामीण भागात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन यांनी हे आवाहन केले. आपण स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून मदतीचे धनादेश परत घेतल्याचे सांगत त्यांनी इतर सक्षम शेतकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. महाजन असेही म्हणाले की, शनिवारी सकाळपासून माझ्याकडे किमान ५० शेतकरी आले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या खात्यात सरकारतर्फे मदतीचे ५ हजार रुपये जमा झाले. मात्र, आमची आर्थिक स्थिती चांगली असल्याने आम्हाला या मदतीची गरज नाही. सहावी योजना… केंद्र किंवा राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सरकारी योजनांचा लाभ नको असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थींनी स्वेच्छेने तो सोडावा, अशी आवाहन मोहीम यापूर्वीही राबवण्यात आली आहे. त्याला प्रतिसादही मिळाला.
Source link
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आवाहन:सधन शेतकऱ्यांनी 5 हजारांचा अग्रिम सीएम फंडास द्यावा- महाजन