दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चेवर पहिल्यांदाच भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बडे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी एकत्रितपणे अंतिम निर्णय घ्यावा. मात्र, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना एनडीएतील घटकपक्ष म्हणून आमच्याशी सल्लामसलत करावी लागेल. दरम्यान, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून शनिवारी सकाळी िडस्चार्ज मिळाल्यावर शरद पवार त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांची पार्थ पवारांशी दीड तास चर्चा झाली. त्यात ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारींविषयी पार्थ यांनी बाजू मांडली असावी, असा कयास आहे. मात्र, दोनदा वेळ घेऊनही सुनेत्रा पवार शरद पवारांना ब्रीच कँडीत भेटण्यास जाऊ शकल्या नाहीत. ४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केला आणि त्यानंतर २४ तासांतच राष्ट्रवादी अजित उर्वरित. स्पोर्ट््स शरद पवारांचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊनच फडणवीसांनी आता हा सावध पवित्रा घेतला असावा राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांनी यापूर्वी किमान तीन वेळा भाजपसोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. तो अनुभव लक्षात घेऊन फडणवीसांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्यावर शरद पवारांना सोबत घेण्यासाठी अजित पवारांनीच ठोस भूमिका घेऊन विलीनीकरण केले पाहिजे, अशी भाजपची भूमिका होती. आता अजित पवार नसल्याने विलीनीकरण झालेच तर राज्य, केंद्रातील सत्तेचे समीकरण कसे ठरणार हे आधी भाजपला सांगितले पाहिजे, असे भाजपचे म्हणणे असावे. तटकरेंना उपमुख्यमंत्री होऊन पक्ष हायजॅक करायचा होता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थ खाते स्वतःकडे घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा सुनील तटकरे यांचा कपटी डाव होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्याने त्यांचा डाव उधळला गेला. विलीनीकरण होणार नाही असा तेव्हा निर्णय झाला होता अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, विलीनीकरणाचे सर्व अधिकार सुनेत्रा पवारांनाच आहेत. तटकरेंचे वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखे आहे. कारण अजित पवार गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विलीनीकरण होणार नाही, असा निर्णय झाला होता. एनडीएतील घटकपक्ष म्हणून आमच्याशी चर्चा आवश्यक फडणवीस म्हणाले की, एनडीएचे घटकपक्ष असल्याने निर्णयाविषयी ते आमच्याशी सल्लामसलत करतील हे नक्की. दोन्ही गटांनी आमच्याशी अद्यापतरी चर्चा केली नाही. त्यांच्या चर्चा सुरू असतील तर त्या आम्हाला सांगितल्या नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितले तर त्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ. ज्येष्ठ नेत्यांची रणनीती पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोन करण्यापूर्वी ४८ तास आधी म्हणजे २ नोव्हेंबर रोजी तटकरे, पटेल, छगन भुजबळांसह ६ ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यात त्यांनी पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या घडामोडी म्हणजे पार्थ आणि सुनेत्रा पवारांवर दबाव आणण्याची रणनीती असल्याचे म्हटले जात आहे.
Source link
दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणास भाजप तयार:पण अटी-शर्तींसह, सिल्व्हर ओकवर पार्थ पवारांची शरद पवारांशी दीड तास चर्चा