![]()
दिवाळीच्या सुटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या दिवाळी सुटीत प्रशासनाने तीन दिवसांची वाढ केली आहे. पूर्वी २ ते १९ नोव्हेंबरपर्यंत असणारी सुटी आता २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यातच २२ नोव्हेंबरला रविवार येत असल्याने विद्यार्थ्यांना आणखी एका दिवसाची सुटी मिळेल. त्यामुळे आता थेट २३ नोव्हेंबरपासून शाळांच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी प्रत्येक घरात साफसफाई, खरेदी, गाठीभेटी आणि पर्यटनाचे नियोजन केले जाते. सुरुवातीला इतर जिल्ह्यांमध्ये सुट्टी ५ ते २३ नोव्हेंबर असल्याने, छत्रपती संभाजीनगरमध्येही तशीच सुटी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. याची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सुटीत वाढ करण्याचे सुधारित आदेश काढले आहेत. विधी विद्यापीठ व सीबीएसई शाळांचे असे आहे नियोजन विधी विद्यापीठाला ७ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुटी जाहीर केली असून, १७ नोव्हेंबरपासून नियमित कामकाज सुरू होईल. तसेच, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांना ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सुटी असेल. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिवाळीत १० दिवसांची सुटी देऊन, उर्वरित सुट्यांचे नियोजन डिसेंबरमध्ये केले आहे.
Source link
दिवाळी सुटीत वाढ; आता 23 नोव्हेंबरला भरणार शाळा:22 तारखेला रविवार असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर