![]()
कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. किनाऱ्यांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. सहलीला गालबोट, ८ निष्पाप जीव गेले पुण्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी शिकवणी वर्गाचे विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. या सहलीत एकूण 42 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असे 44 जण सहभागी होते. समुद्रकिनारी गेल्यानंतर काही विद्यार्थी पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले. यात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता अकरावीत शिकत होते. या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय’ या घटनेवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मुले पिकनिकसाठी जातात, पण महाराष्ट्रात जिथे जिथे असे समुद्रकिनारे (Beaches) आहेत, तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था असायला हवी. तिथे सुरक्षा रक्षक आणि बचाव पथक (Rescue Team) तैनात असणे गरजेचे आहे. एखादा बीच धोकादायक असेल, तर तिथे लोकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक (Board) असायला हवा. मात्र, सरकारला याचे काहीही देणेघेणे नाही. सरकार काहीही करत नसून केवळ लोकांच्या जीवाशी खेळत आहे.” मदतीची आणि चौकशीची मागणी या निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोणाला धरायचे? असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी उपाययोजनांची मागणी केली. “जिथे असे बीचेस आहेत, तिथे किमान एक-दोन सुरक्षा रक्षक नेमून आणि लाऊडस्पीकरची व्यवस्था करून, कोणी बुडताना दिसल्यास त्याला त्वरित वाचवण्यासाठी काम झाले पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून किंवा इतर मार्गाने राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी विनंतीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या अपघाताचे फोटोज…
हेही वाचा.. दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना: सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा
Source link
दिवेआगर दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार आक्रमक:म्हणाले- 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय; कुटुंबांना तातडीने मदतीची मागणी