![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची खाटांची क्षमता ४७६ वरून १,१६० करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने, उपअधिष्ठाता डॉ. दिनेश नैताम यांनी रुग्णालयावरील वाढता ताण आणि खाटांची आवश्यकता व रिक्त पदे भरण्याबाबत भूमिका मांडली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक झाली. सध्या रुग्णालयाची अधिकृत क्षमता ४७६ खाटांची असली तरी दररोज सुमारे १,१०० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यामुळे १,१६० खाटांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. याच बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तब्बल ५०५ रिक्त पदे भरणे, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देणे तसेच महाविद्यालयातील पूर्णवेळ प्रशासकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘सर्वोपचार’ रुग्णालयात बेड क्षमता होणार दुपटीहून अधिक, मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत कार्यवाहीचे संकेत