![]()
नेतृत्व हे केवळ सन्मानाचे प्रतीक नसून जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपण्याची संधी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेतृत्व करणारे नागरिक आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. भोजराज चौधरी यांनी केले. एडिफाय शाळेत चालू शैक्षणिक सत्रासाठी आयोजित पदग्रहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बॅच प्रदान करून नेतृत्व, शिस्त, जबाबदारी आणि सेवाभावाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, संगीत आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वित्त विभागप्रमुख व प्रादेशिक कला विभागप्रमुख डॉ. भोजराज चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्कृती जिल्हेवार हिच्या भरतनाट्यम शैलीतील गणेशस्तुती नृत्याने झाली. त्यानंतर इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी शाळा प्रमुख विद्यार्थी म्हणून आशमन खारा, शाळा प्रमुख विद्यार्थिनी आराध्या माहोरे, शाळा उपप्रमुख विद्यार्थी वेदिक तायडे आणि शाळा उपप्रमुख विद्यार्थिनी आराध्या बाफना यांना पदभार प्रदान करण्यात आला. याचबरोबर चारही गटांच्या प्रमुख व उपप्रमुखांची घोषणा करण्यात आली. पाणी (निळा) गटप्रमुख ओजस चौधरी व उपप्रमुख पूर्वी महल्ले, पृथ्वी (हिरवा) गटप्रमुख मधुर लोहे व उपप्रमुख त्रिशा हेडाऊ, अग्नी (लाल) गटप्रमुख तनिष्का बिजवार व उपप्रमुख अनन्या गायकवाड, तर वायू (पिवळा) गटप्रमुख श्रियांश नागे व उपप्रमुख रीत पवार यांची नियुक्ती करण्यात आली. अनवी गटाडे हिची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली. शिस्त प्रमुख शेयान गायकवाड व उपप्रमुख अमित्र कत्रे, क्रीडाप्रमुख अर्थव सिंग व उपप्रमुख सई राऊत, नृत्यप्रमुख संस्कृति जिल्हेवार व उपप्रमुख मेहक भोजवानी, तसेच कला प्रमुख आमिना उनस व उपप्रमुख यशस्वी माकोडे यांची निवड करण्यात आली. शालेय वर्ष २०२५-२६ मधील आंतरगट स्पर्धांमध्ये हिरवा गट विजेता ठरल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी पदासोबत येणारी जबाबदारीही तितक्याच निष्ठेने पार पाडावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रशासन प्रमुख अतुल अभारे व सांस्कृतिक विभाग प्रमुख भारत मोंढे यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध विभागांच्या समन्वयकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी भारखडे व संयुक्ता उल्हे यांनी केले, तर काव्या पवार हिने आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. निष्ठापूर्वक कार्य करण्याचा देण्यात आला सल्ला एडिफाय शाळेचे संचालक रवी इंगळे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, समर्पण आणि प्रामाणिकतेने आपली सर्व जबाबदारी पार पाडून विद्यालयाची उज्ज्वल परंपरा अधिक उंचावण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले. तसेच, व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. पुरणलाल हबलानी व संचालक शिवा रामाकृष्णा यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जी. गोपिनाथ यांनीही विद्यार्थ्यांना आपल्या पदाचे महत्त्व व जबाबदारीचे पूर्ण भान ठेवून निष्ठापूर्वक कार्य करण्याचा अमूल्य सल्ला दिला.
Source link
नेतृत्व म्हणजे पद नव्हे, तर जबाबदारी स्वीकारण्याची संधी- भोजराज चौधरी:एडिफाय शाळेत पदग्रहण समारंभ सोहळा, उत्तरदायित्वाची दिली जाणीव