Headlines

पिंपळगाव जि.प. शाळेचे‎ पत्रे वादळी वाऱ्यात उडाले:शालतील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, दुरुस्तीची मागणी




फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गंगादेव येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यात उडून गेली. काही पत्रे शाळेला लागून असलेल्या लिंबाच्या झाडावर अडकली, तर काही पत्रे शाळेच्या परिसरातील घरांवर जाऊन पडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी सांगितले, शाळेच्या निकृष्ट व जीर्ण अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी गावातील पालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत एकमुखाने निर्णय घेत जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी प्रशासनाला दिला. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शाळेसाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. नवीन शाळा इमारतीचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा तात्पुरत्या स्वरूपात मंदिरात किंवा ग्रामपंचायत इमारतीत भरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्या गीतांजली पाथ्रीकर, वरूण पाथ्रीकर, पं. स. सदस्य गणेश काळे, प्रशासक अंबादास गायके यांनी शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. निजामकालीन बांधकाम १९६९ मध्ये दगड, विटांत बांधकाम पिंपळगाव गंगादेव जिल्हा परिषद शाळा निजामकालीन असून इमारतीच्या भिंतीचे बांधकाम १९६९ मध्ये दगड व विटांमध्ये करण्यात आले होते. २०२४ मध्ये देखील शाळेवरील पत्रे वादळामुळे उडून गेली होती. त्यानंतर संबंधित विभागाने दुरुस्ती केली. मात्र यावर्षी पहिल्याच वादळात पुन्हा पत्रे उडाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *