Headlines

पुण्यात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांंचा मृत्यू:कॅनमागे आठशे रु.च्या फायद्यासाठी दारूत मिसळले घातक ‘मिथेनाॅल’




पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉल रसायन मिसळून ती विषारी बनवण्याचा प्रकार मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने केला आहे. व्हानकडे याने घटनेच्या 15 दिवस आधीच मिथेनॉलची एका ऑनलाइन पोर्टलवरुन खरेदी केली आणि त्याचा साठा स्वत:कडे करून ठेवला होता. राधेशाम प्रजापती याच्याकडून हातभट्टी दारू विकत घेतल्यानंतर प्रत्येक कॅनमागे 800 रुपयांचा आर्थिक फायदा मिळावा यासाठी दारूमध्ये पाणी मिसळून त्याची नशा तीव्रता कायम राहण्यासाठी मिथेनॉल रसायन आरोपीनी एकत्रित केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी योगेश व्हानकडे हा पुण्यातील मुंढवा परिसरात केशवनगर भागात आई-वडील यांच्यासह राहण्यास आहे. वानखेडेवर यापूर्वीही ती गुन्हे दाखल पिंपरी चिंचवडचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार म्हणाले, योगेश व्हानकडे याने आर्थिक नफा अधिक मिळावा यादृष्टीने त्यात मिथेनॉल रसायन मिसळल्याचे दिसून आले आहे. वानखेडे हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी देखील तीन गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या आधीच आरोपीने इंडिया मार्ट या ऑनलाइन वेबसाइटवरून 215 लिटर मिथेनॉलची खरेदी केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर संबंधित मिथेनॉल त्याने हातभट्टी दारूत मिसळल्यावर त्याची विक्री केली. विषारी दारू प्यायल्याने एका दिवसातच सर्वांचा मृत्यू झाला आहे. 2700 रुपयांना कॅन विक्री मागील तीन ते चार वर्षांपासून उरळीकांचनमधील राधेश्याम प्रजापती याच्याकडून हातभट्टीची दारू घेऊन त्याची विक्री हडपसर, गोखलेनगर, फुगेवाडी, बोपोडी परिसरातील विविध दारू गुत्त्यावर करायचा. प्रजापतीकडून 35 लिटरचे दारूचे कॅन तो 1900 रुपयांना विकत घेत होता. पुढे दारू गुत्त्यावर ही कॅन तो 2700 रुपयांपर्यंत विक्री करत होता. मिथेनॉलचा मेंदूवर परिणाम डॉ.कल्याण गंगावल म्हणाले, नियमित दारूमध्ये इथेनॉल हे रसायन असते व त्याचे प्रमाण दारूच्या विविध प्रकारात कमी-जास्त प्रमाणात असते, परंतु त्याचे अतिसेवन केल्यावरच मृत्यू होतो, परंतु देशी दारू मध्ये विशेषत: हातभट्टीत मिथेनॉल मिसळण्याचे प्रकार वारंवार घडतात व त्यामुळे अनेकांचा सातत्याने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. मिथेनॉल हे पिल्यावर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होत असतो. त्याचे प्रमाण थोडे जरी सेवन केले तरी त्याचा दुष्परिणाम जाणवतो. मेंदूसोबतच किडनीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. यातूनही मृत्यूही होऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *