![]()
विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (शनिवारी) दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या तनपुरे यांच्या या बंडामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केली होती. त्याच वेळी तनपुरे यांचा भाजप प्रवेश आणि विधान परिषदेची उमेदवारी पडद्यामागे निश्चित झाली होती. तीन दिवसांपूर्वी मामा जयंत पाटील यांचा फोटो स्टेटसवर ठेवत त्यांनी सूचक संकेत दिले होते, तर शुक्रवारी सकाळी त्यांच्या कार्यालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. आज त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या गळाला आणखी किती नेते लागतात हे पाहावे लागणार आहे.
Source link
शरद पवार गटाला मोठा धक्का:माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये करणार प्रवेश