![]()
आजच्या मोबाईल आणि टॅबलेटच्या डिजिटल युगातही अहिल्यानगर शहरातील गल्ल्यांमधून मातीचा तोच जुना घमघमाट पुन्हा दरवळू लागला आहे. तोफखाना परिसर, सावेडी, स्टेशन रोड असो किंवा शहरातील जुनी हद्द, प्रत्येक भागातील बालचमू मातीचे ढीग गोळा करून आपल्या राजांच्या पर
.
यंदाच्या दिवाळीत केवळ बाजारातून तयार कृत्रिम वस्तू आणण्यापेक्षा मुलांनी स्वतः मातीत हात घालणे पसंत केले आहे. सावेडी उपनगरातील सिव्हिल हडको भागात राहणाऱ्या काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन महिनाभर आधीपासूनच नियोजनास सुरुवात केली. या मुलांनी केवळ मातीची जुळवाजुळव केली नाही, तर इतिहासाची पुस्तके चाळत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांची माहिती गोळा केली. “आम्ही यंदा ‘शिवनेरी’ किल्ल्याची प्रतिकृती साकारत आहोत. महाराजांचा जन्माचा इतिहास असलेला हा किल्ला कसा होता, हे आम्हाला आमच्या हाताने बनवून अनुभवायचे आहे,” असे आठवीत शिकणाऱ्या सोहम या बालमावळ्याने सांगितले.
पालक, आजी-आजोबांचे मिळतेय मार्गदर्शन किल्ला बनवण्याच्या या प्रक्रियेत केवळ मुलेच नाही, तर त्यांचे पालक आणि आजी-आजोबाही उत्साहाने सहभागी झाले आहेत. सायंकाळच्या वेळी ऑफिसमधून घरी परतल्यावर वडील आपल्या मुलांना तटबंदी पक्की कशी करायची, बुरुज कसा बांधायचा याचे तंत्र शिकवत आहेत.
डिजिटल युगातही इतिहासाशी नाळ कायम आमच्या लहानपणी नगरमध्ये प्रत्येक गल्लीत मातीचे किल्ले बनवले जायचे. आजची मुले मोबाईलमध्ये रमत असली, तरी दिवाळीच्या निमित्ताने का होईना, त्यांना पुन्हा मातीशी आणि आपल्या इतिहासाशी जोडताना पाहून मनाला मोठा आनंद होतो. – जयंत येलूलकर, ज्येष्ठ नागरिक