Headlines

बोगस दस्त नोंदवणाऱ्या दुय्यम निबंधकांवर गुन्हे दाखल करा:खासदार संदिपान भुमरे यांचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आदेश‎




फिंगरप्रिंट येत नाही म्हणून ऑफलाईन रजिस्ट्री करत तोतया उभे करून तब्बल ८ कोटींच्या जमिनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी चव्हाट्यावर आणला होता. फिंगरप्रिंट येत नाही म्हणत ऑफलाईन रजिस्ट्री, तोतया उभे करून लाटल्या ८ कोटीच्या जमिनी या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या या वृत्ताची खासदार संदिपान भुमरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, बोगस दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांनाच मुख्य आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले. नोंदणी विभागाच्या उपमहानिरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधकांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सुचना केल्या. तुकडेबंदी, बोगस मूल्यांकनाची प्रशासनातर्फे होणार तपासणी जिल्ह्यात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन, संशयास्पद व्यवहार, कमी मूल्यांकन आणि मुद्रांक शुल्कातील तफावतीमुळे शासनाचा महसूल बुडवणाऱ्या प्रकरणांची आता सविस्तर छाननी केली जाणार आहे. मागील आणि चालू आर्थिक वर्षात प्रत्येक कार्यालयात किती दस्त नोंदणीकृत झाले आणि महसूल किती आला, याचा हिशेब मागवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *