Headlines

मनपा सत्ताधाऱ्यांमध्येच ‘सुंदोपसुंदी’:भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांची पोलिसांत धाव; भारुकांवर 2 गुन्हे, अग्रवालांविरुद्ध नाही‎




महापालिका स्थायी समिती सभापती तथा भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदे सेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात सोमवारी सभागृहात तसेच त्यानंतर बुधवारी झालेल्या वादाचे पडसाद गुरुवारीही उमटले. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भारुका यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले. मात्र भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, भारुका स्वत:हून पोलिसांत हजर झाले. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केला. एकूणच वर्चस्वाच्या लढाईसाठी मनपातील सत्ताधाऱ्यांतील या ‘सुंदोपसुंदी’ ने मात्र पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. दरम्यान, अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून शिंदे सेना नगरसेवक भारुका यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिंदे सेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया भारुकांसाठी आक्रमक झाले असून, गुरुवारी त्यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठून अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, निवेदनावर पोलिसांनी तूर्त हे निवेदन स्वीकारून चौकशीचे आश्वासन दिले आहे. गुन्हा न नोंदवल्याने शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप करावा, अशी त्यांची मागणी आहे. बुधवारी दुपारी महापालिका आवारात भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदे सेनेचे नगरसेवक सागर भारुका यांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या वादाचे रूपांतर थेट लोटालोटीत होऊन दोन्ही लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. भारुका-अग्रवाल वादाला बाजोरियांचे खतपाणी सागर भारुका यांच्या तक्रार अर्जावर चौकशी सुरू ^भाजपचे सभापती विजय अग्रवाल यांच्या विरोधात शिंदे सेनेचे नगरसेवक सागर भारुका यांचा तक्रार अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या तक्रार अर्जावर चौकशी सुरू आहे. अद्याप अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. – संजय गवई, पोलिस निरीक्षक, सिटी कोतवाली, पोलिस ठाणे. अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा ^प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विजय अग्रवाल यांनी मला मुद्दाम डिवचले. त्यामुळे मी त्यांना कुणाला बोलताय, अशी विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांची आणि माझी हमरीतुमरी झाली. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मी देखील दिलेल्या सिटी कोतवाली पोलिसांत अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मला प्रामाणिकपणे न्याय द्यावा, ही प्रामाणिक अपेक्षा आहे. – सागर भारुका, नगरसेवक, शिवसेना.
महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता असून शिंदे सेना हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येच अशा प्रकारे राजकीय सुंदोपसुंदी पहायला मिळत असल्याने युतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे सेनेने आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारींचा पाढा वाचणे सुरू केला असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी मंुबईत हा वाद पोहोचला आहे. अकोला शहराच्या स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे उपनेते आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यातील ‘राजकीय सख्य’ सर्वश्रूत आहे. त्यामुळे भारुका यांच्या बाजुने बाजोरिया उभे राहिल्याने पुन्हा एकदा अग्रवाल- बाजोरिया यांच्यातील यांच्यातील राजकीय विरोध उघड झाला आहे. मंुबईतील दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांना स्थानिक पक्षाचे पदाधिकारी अन कार्यकर्त्यांना सांभाळणे आवश्यक असल्याने पक्षाचे दोन्ही वरिष्ठ नेते हा वाद कसा सोडवतात, याकडे लक्ष लागले आहे. गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक भारुका यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वादाला मनपाने बॅनर हटवल्याची किनार अतिक्रमण निर्मूलन विभागाने नगरसेवक भारुका यांचे बॅनर्स हटवल्याची किनार या वादाला आहे. तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी दोघांना आवरल्याने पुढील अनर्थ टळला. तूर्त हा वाद शमला असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. आगामी महापालिकेच्या सभेत सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यासह अलीकडेच निवडून आलेल्या विरोधी पक्षातील काही ‘पहेलवान’ नगरसेवकांमुळे मनपा कुस्तीचा आखाडा बनणार, याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *