![]()
महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (आज) काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले यांनी समाजातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. देशमुख पुढे म्हणाले की, स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य देशासाठी आजही मार्गदर्शक आहे. आजच्या काळात सामाजिक समता आणि बंधुता टिकवण्यासाठी त्यांचे विचार अधिक प्रभावी ठरतात. काँग्रेस पक्ष महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर चालत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करत आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला. यावेळी राजीवकाका ठाकूर, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख, प्रकाशराव काळबांडे, रामेश्वरराव अभ्यंकर, सतीशराव हाडोळे, संजयराव नागोणे, मुकद्दर खा पठाण, सिद्धार्थ बोबडे, बिट्टूभाऊ मंगरोळे, नंदकिशोर यादव, निखिल काटोलकर, गजानन देशमुख, विनायकराव ठाकरे, समीर जवंजाळ, आशिष यादव, वैभव देशमुखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी उन्नतीसाठी मार्गदर्शक:काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे प्रतिपादन