Headlines

माता तुळजाईच्या सीमोल्लंघनाला‎ 60 हजार भाविक:6 तास मिरवणूक‎, मध्यरात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत तुळजाभवानी मातेचा जयघोष‎




महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी‎मातेचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा‎बुधवारी (२१ ऑक्टोबर) पहाटे श्री क्षेत्र‎तुळजापूर येथे भक्तिभावात पार पडला. या‎सोहळ्यासाठी सुमारे ६० हजार भाविक‎उपस्थित होते. मध्यरात्री १२ वाजता सुरू‎झालेली पालखी मिरवणूक पहाटे ६ वाजेपर्यंत‎चालली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने‎भाविकांनी कुंकू आणि फुलांची उधळण‎करत ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष‎केला. पारंपरिक संबळाच्या निनादाने संपूर्ण‎परिसर भक्तिमय झाला.‎ सीमोल्लंघनासाठी देवीच्या मूर्तीला संरक्षक‎कवच तयार करण्यात आले. त्यानंतर देवीची‎मूर्ती पालखीत विराजमान करून मंदिराबाहेर‎आणण्यात आली. मंदिराभोवती प्रदक्षिणा‎घालून पिंपळाच्या पारावर आरती व साखर ‎‎भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. ‎‎सीमोल्लंघनानंतर देवीच्या श्रमनिद्रेला प्रारंभ ‎‎झाला. या सोहळ्यात अहिल्यानगर‎जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर येथील मानाच्या‎पलंग पालखीच्या परंपरेला महत्त्व आहे.‎ बुऱ्हाणनगरच्या पलंग पालखीचा मान‎ अहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर येथील मानाच्या पलंग‎पालखीला सुमारे १२०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले‎जाते. भगत कुटुंबातील ॲड. अभिषेक भगत हे या परंपरेचे ३०‎वे वारसदार आहेत. सीमोल्लंघनानंतर देवी पाच दिवस‎मंचकी निद्रेत विराजमान होते, अशी परंपरा आहे.‎ देवीला १०८ सुती‎साड्यांचे संरक्षक कवच‎ सीमोल्लंघन सोहळ्यापूर्वी देवीच्या‎मूळ मूर्तीला १०८ सुती साड्यांची‎पिळे (दिंड) नेसवून संरक्षक कवच‎तयार केले जाते. पालखीतून‎मंदिराबाहेर आणलेल्या देवीची‎मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात‎येते. त्यानंतर आरती आणि नैवेद्य‎अर्पण केला जातो. विशेष म्हणजे‎बुऱ्हाणनगर येथील पालखी ज्या‎ठिकाणी ठेवली जाते त्या शुक्रवार‎पेठेत संत जनकोजी भगत यांची‎समाधी आहे.‎ मंचकी निद्रेनंतर देवी सिंहासनावर विराजमान‎ महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केल्यानंतर देवी‎विश्रांतीसाठी मंचकी निद्रेत जाते, अशी आख्यायिका आहे.‎सीमोल्लंघनानंतर देवी मानाच्या पलंगावर विराजमान होते.‎आश्विन पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होते .‎कोजागरीला चार ते पाच राज्यांतून भाविक तुळजापुरात येतात.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *