Headlines

मोहन भागवतांनी संघाच्या भाषेत सरकारला फटकारले:पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी, मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘Gen Z’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही, असे म्हटल्याचा उल्लेख करत देशपांडे म्हणाले की, “संघाच्या भाषेत सरकारला जितके फटकारता येईल तितके मोहन भागवतांनी फटकारले आहे.” पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषद न घेण्याच्या भूमिकेवरही टीका केली. “देशाचे पंतप्रधान नियमित पत्रकार परिषद घेत नाहीत. ठरावीक लोकांनाच मुलाखती देतात. अशा परिस्थितीत मोहन भागवत यांनी दिलेली मुलाखत महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले. आंदोलन हे संवादाचे माध्यम मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत देशपांडे म्हणाले की, आंदोलन हे संवादाचे एक माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “हे आम्हाला आधीपासूनच माहिती होते. आता ते पंतप्रधान मोदींना समजते का, हे पाहावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला. देशपांडे यांनी पुढे उपरोधिक भाषेत म्हटले की, “भागवत यांच्या मुलाखतीला कोणी पाकिस्तान पुरस्कृत किंवा देशविरोधी म्हणणार नाही. कारण ती संघाच्या प्रमुखांची मुलाखत आहे.” मोदींनी पत्रकार परिषद घेतली तर देशात दिवाळी साजरी होईल पंतप्रधान मोदी आज एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील खासदारांची भेट घेणार असल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले, “ब्रेकफास्टला कोणाला बोलावले यापेक्षा पंतप्रधानांनी एकदा पत्रकार परिषद घ्यावी. ज्या दिवशी नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेतील, त्या दिवशी आम्ही आकाशात फटाके फोडू. देशात दिवाळी साजरी होईल.” मोहन भागवतांनी सरकारला खडे बोल सुनावले देशपांडे यांच्या मते, भागवत यांनी सरकारवर टीका करतानाच पंतप्रधान मोदी यांची बाजूही काही प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न केला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला या संपूर्ण प्रकरणापासून काहीसे अलिप्त दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मुलाखतीत दिसते,” असेही त्यांनी म्हटले. मराठी भाषेच्या मोहिमेला पाठिंबा मराठी भाषेबाबत सुरू असलेल्या मोहिमेबाबत विचारले असता देशपांडे म्हणाले, “ज्यावेळी चांगले काम होत असेल, त्यावेळी आमचा त्याला पाठिंबा असतो. मराठी बोलण्याबाबतचा माज उतरतो का, हे 15 ऑगस्टनंतर दिसेल. मात्र मनसेची मराठीसाठीची मोहीम कधीच थांबलेली नाही.” जरांगे-शिंदे वादावर भाष्य टाळले मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादावर प्रतिक्रिया देण्यास देशपांडे यांनी नकार दिला. “तो त्यांचा विषय आहे. त्यावर त्यांनीच बोलावे,” असे सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करण्यास टाळले. हेही वाचा… निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत ‘फ्रॉड’: राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *