Headlines

यवतमाळच्या ‘टिपेश्वर’मधून आलेल्या वाघाच्या हल्ल्यात आष्टीचा शेतकरी ठार:शेतकरी गवत कापत असताना वाघाने अचानक केला हल्ला




आष्टी तालुक्यातील देवळाली (जि. बीड) गावालगतच्या लोखंडवाडीत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या रामलिंग वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. देविदास माणिकराव टकले (४०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील देवळाली नजीकच्या लोखंडवाडी येथील शेतकरी देविदास टकले हे गावातील सोनीपठार या माळावर शनिवारी सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा वाघ मागील २ वर्षांपासून बीड व धाराशिव जिल्ह्यात वावरत आहे. सध्या आष्टी व पाटोदा तालुक्यात त्याचे वास्तव्य आहे. तो अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान, आतापर्यंत त्याने मानवावर हल्ला केल्याची घटना घडली नव्हती. प्रथमच त्याने असा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलिस प्रशासनाने धाव घेत पाहणी केली. सध्या येथे भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी दरी किंवा जंगल जवळ असेल अशा शेतात एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले. आठवडाभरापासून उपाशी असावा, म्हणून केला हल्ला वाघ एकदा शिकार केल्यानंतर किमान आठवडाभर उपाशी राहू शकतो. तो शक्यतो मानवावर हल्ला करत नाही. मात्र त्यापेक्षा अधिक काळ तो उपाशी असल्यास मानवावर हल्ला करू शकतो. रामलिंग वाघही उपाशी असण्याची शक्यता आहे. – सिद्धार्थ सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, बीड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *