Headlines

एकतर्फी प्रेमातून थरार:तरुणीचे अपहरण; बहिणीवर‎ कोयत्याने वार, आईला मारहाण‎, कळंब तालुक्यातील बोर्डा येथील घटना




एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेला‎ वाद विकोपाला गेला. कळंब ‎तालुक्यातील बोर्डा येथे ही घटना‎ घडली. एकतर्फी प्रेमातून अभिजित ‎नवाद या तरुणाने घरात घुसून ‎तरुणीच्या आईला लाथा बुक्क्यांनी‎ मारहाण केली. बहिणीवर कोयत्याने‎ वार केले. जातिवाचक शिवीगाळ ‎करत एका २३ वर्षीय तरुणीला‎ वाहनातून जबरदस्तीने नेले. ‎त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून‎ वाहन अडवले. आरोपीने तरुणीच्या ‎मानेवर कोयता ठेवून तब्बल ४० ‎मिनिटे पोलिसांना हुलकावणी दिली.‎अखेर पोलिसांनी चातुर्याने तरुणीची ‎आरोपीच्या तावडीतून सुखरूप ‎सुटका केली.‎ कळंब तालुक्यातील बोर्डा येथील ‎एका २३ वर्षीय तरुणीवर एका ‎युवकाचे एकतर्फी प्रेम असल्याची‎ माहिती समोर आली आहे. या‎ प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या ‎वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले.‎ पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर ‎आरोपीने तरुणीच्या मानेवर‎ धारदार कोयता रोखला. ‘कोणी‎पुढे आले तर एकतर या मुलीला‎ संपवतो, नाही तर स्वतःला ‎संपवतो,’ अशी धमकी देत‎ आरोपीने पोलिसांसमोर थरारक ‎परिस्थिती निर्माण केली. तब्बल‎ ४० मिनिटे हा थरार सुरू होता.‎अखेर पोलिसांनी संयम‎ दाखवला. चातुर्य दाखवले.‎ तरुणीची सुखरूप सुटका केली.‎ घटनेची माहिती मिळताच ‎कळंब पोलिसांनी पाठलाग सुरू ‎केला. पोलिसांनी कार अडवून‎ आरोपीला रोखले. आरोपीने‎ पोलिसांच्या अंगावर जाण्याचा‎ प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर‎ बनली. तरुणीची सुटका‎ करण्यासाठी पोलिसांना‎ सावधगिरीने परिस्थिती‎ हाताळावी लागली. पोलिसांनी‎ चातुर्याने तरुणीची आरोपीच्या ‎तावडीतून सुटका केली.‎ ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक‎ वाजेच्या सुमारास आरोपी कारमधून‎ बोर्डा येथील तरुणीच्या घरी‎ पोहोचला. त्याने तरुणीच्या आईला‎ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.‎तिच्या बहिणीवर कोयत्याने वार‎ केले. कोयत्याचा धाक दाखवण्यात‎ आला. जीवे मारण्याची धमकी देत‎ तरुणीला जबरदस्तीने वाहनात‎ बसवले. तिला बोर्डा येथून दगडवाडी‎ शिवारातील खडी केंद्रापर्यंत नेण्यात‎ आले. याप्रकरणी अभिजित ऊर्फ‎ तन्या अर्जुन नवाद (२४, रा.‎कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे‎ (रा. बोरगाव, ता. कळंब), अजय‎ रामकिसन माने (रा. परळी रोड ‎बायपास, कळंब) व अन्य एका‎ व्यक्तीविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात ‎गुन्हा दाखल झाला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी‎ संजय पवार करीत आहेत.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *