![]()
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या व्यक्तींची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने अखंडितपणे तेरा वर्षापासून देण्यात येणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार हा समकालीन लोकांना स्फूर्ती देणारा तर
.
येथील युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात आयोजित राज्यस्तरीय व तालुकास्तरीय ‘युगदर्शक आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून सोपल बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर बार्शी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, धाराशिव जिल्हा परिषदेचे गटनेते विकी चव्हाण, नगरसेवक बप्पा कसबे, उद्योजक सतीश अंधारे, डॉ. विलास देशमुख,नगरसेवक राहुल कोंढारे, अमोल मांगडे, अजय भानवसे, मुज्जमिल पठाण, हेमंत रामगुडे, दिनेश नाळे, राजाभाऊ शेळके उपस्थित होते. या वेळी सोपल यांनी युगदर्शक प्रतिष्ठानचे प्रमुख नितीन भोसले व त्यांच्या सर्व टीमचे हा उपक्रम सातत्याने १३ वर्षे राबवल्याने अभिनंदन केले तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देत असे उपक्रम राबवल्याने समाजामध्ये विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांचा मानसन्मान होतो असे सांगितले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले.
युगदर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलेले मान्यवर राज्यस्तरीय उद्योग आयकॉन : बालाजी घोलप, राज्यस्तरीय वैद्यकीय आयकॉन : डॉ. सचिन बोटे, राज्यस्तरीय विधी आयकॉन : ॲड. राहुल पाटील, राज्यस्तरीय कृषी आयकॉन: दिनकर गुंड. तसेच युवा बार्शी आयकॉन: मनोज पवार, कला बार्शी आयकॉन : राहुल उपरे, शिक्षण आयकॉन : संभाजी घाडगे, सामाजिक बार्शी आयकॉन: अरुण चौधरी, बार्शी क्रीडा सेवा आयकॉन : प्रवीण तातेड, पत्रकार बार्शी आयकॉन : प्रशांत खराडे.