Headlines

रब्बीही संकटात: जिल्ह्यात रब्बीच्या अवघ्या 28 टक्केच पेरण्या; धान्य, डाळी महागण्याचे संकेत



जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर आता रब्बीच्या पेरण्याही रखडल्या आहेत. २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ६६७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ १ लाख २

.

खरिप बुडला अन् रब्बीच्या पेरण्याही रखडल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०३.५० टक्के विक्रमी पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा बंपर पीक येऊन महागाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पिकांच्या वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या काळात पावसाने मोठा खंड दिला. परिणामी, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि उत्पादन निम्म्यावर आले. आता जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीच्या पेरण्याही रखडल्या आहेत.

गेल्या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात ४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यामध्ये गहू १ लाख ५८ हजार, ज्वारी १ लाख २० हजार, हरभरा १ लाख २ हजार, तर मक्याची ५८ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ही आकडेवारी निम्म्यावरही पोहोचलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *