![]()
तालुक्यातील भोईंजे येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या पाच तासांत माग काढला. या प्रकरणी भोईंजेतील तीन युवकांना ताब्यात घेतले असून, चोरीचा ट्रॅक्टर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली. याबाबत अधिक माहि
.
चोरी केलेला ट्रॅक्टर माढा-पंढरपूर मार्गावरील तुळशी गावाच्या परिसरातील जंगलात लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमारे ९० किलोमीटर अंतरावर जाऊन जंगल परिसरातून ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा चोरीचा ट्रॅक्टर हस्तगत केला.