![]()
चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलंगणा गावापासून सुमारे दिड ते दोन किमी अंतरावरील डोंगराळ शेतात आंतरपिक म्हणून थेट गांजाची लागवड केली होती. ही माहीती एलसीबीच्या पथकाला मिळताच पोलिसांनी थेट शेत गाठले व शेतातील गांजाची झाडे जप्त केली. या शेतातून २९
.
तीन तास लागले गांजा जमा करायला राजाराम धिकार याने आपल्या शेतात इतर पिकांमध्ये गांजाची लागवड केली होती, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही शेतात गांजा असल्याचा संशय येऊ नये. मात्र, पोलिसांना अचूक माहिती मिळताच पथकाने तिथे धडक देऊन ही सर्व ३७ झाडे मुळासकट उपटून काढली आणि जप्त केली. डोंगराळ भाग आणि पिकांच्या मधून ही झाडे काढून ती गोळा करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला पोलिसांना अडीच ते तीन तासांचा कालावधी लागला.