![]()
गॅस टँकरमधून अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार रांजणगाव पोळ, ता. गंगापूर शिवारात उघडकीस आला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी कारवाई करत टँकर, त्यातील सुमारे ११ हजार ७२० किलो गॅस, सिलिंडर व गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १८ ऑक्टोबर रोजी रात्री रांजणगाव पोळ शिवारात एलपीजी गॅसची अनधिकृतपणे चोरी करून सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. त्यानुसार शिल्लेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एमएच ०४ एमआर ३०६९ क्रमांकाच्या टँकरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचे आढळले.
Source link
रांजणगाव पोळ येथे गॅस चोरीचा पर्दाफाश:टँकरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार उघड; चार जण फरार