![]()
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सण म्हणजे दसरा नागद गावामध्ये मोठ्या पारंपरिक उत्साहात आणि चैतन्य वातावरणात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे दुपारी तीन वाजता बँडपथकाच्या गजरामध्ये सजवलेल्या पालखीमध्ये बालाजीची प्रतिमा ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावापासून दोन किलोमीटरवर बाबू तात्या परदेशी यांच्या शेतातील आपट्याच्या झाडाजवळ देण्यात आली. तेथे बालाजी मंदिराचे पुजारी मनीष मिश्रा यांनी माजी आमदार नितीन पाटील यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व आरती केली. याप्रसंगी गावातील राजेश पाटील, चंद्रकांत पाटील, कतारसिंह हजारी, शेखर पाटील, देवीलाल राजपूत, संभाजी पाटील, महेंद्र आजारी, नंदलाल जैन, सुभाष शिरा, भोला पाटील, जगदीश पाटील, राहुल पाटील, राजू चव्हाण, सुभाष महाजन, दिलीप जैन, प्रमोद जैन, निंबा कोळी, बद्री चन्नावत व सर्व भक्त परिवार उपस्थित होता.
Source link
नागद येथे बालाजीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक:माजी आमदार नितीन पाटील यांच्या वतीनेमहाप्रसाद