![]()
आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव चड्डा आणि त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर ईडीची रेड पडली आणि ते भाजपमध्ये पळून गेले इतकीच ती गोष्ट आहे. महाराष्ट्रातही तेच झाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत ते लोकं सुद्धा पळून गेले. हे डरपोक लोकं असतात ते अशी कारवाई झाली की पळून जातात. सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावर दोन गट पडता कामानये, हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्रासाठी 106 हुतात्मानी रक्त सांडले आहे. शिवाजी महाराज थकलेले कोणी पाहिले का? संजय राऊत म्हणाले की, शिवाजी महाराज थकलेले कोणी पाहिले का? त्यांच्या लढाईने औरंगजेब थकवला, अफजल खान फाडला त्यांच्याबद्दल तुम्ही हे वक्तव्य करतात हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपला शिवाजी महाराज यांच्याविषयी आस्था नाही. महाराजांबद्दल अशी वक्तव्ये करणारी लोकं मुर्ख आहेत. हे सगळे बुआ बाबा भाजपचे प्रचारक आहेत. ते त्यांना बजेट देत असतात. शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे विचार तोकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवरायांच्या इतिहासाची मोड-तोड सुरू संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सरसंघचालक यांच्या उपस्थितीमध्ये बुआ आणि महाराजांना आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोड-तोड करण्याचे कारण काय आहे? असा सवाल राऊतांनी केला आहे. शिवरायांच्या नावाने आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते ते कधी थकले आणि झुकले नाही. म्हणून महाराष्ट्र थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही. हे महाराज आणतात आणि असे नवीन इतिहास लिहत आहेत, तो महाराष्ट्राला मान्य नाही. ते बुआ बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक यांनी थांबवायला पाहिजे होते. बागेश्वर बाबांनी पहिले स्वत: मुले जन्माला घालावी संजय राऊत म्हणाले की, बागेश्वर बाबा यांचे वय काय? अभ्यास काय? ते म्हणतात 4 मुलं जन्माला घाला? त्यांनी लोकांना सल्ला देण्यापूर्वी स्वत: मुले जन्माला घालावी. तुम्ही ब्रह्मचारी अजून तुमचे लग्न झाले नाही आणि दुसऱ्यांना सांगत आहात 4 मुले जन्माला घाला आणि 1 मुलं संघाला द्या. तुम्ही स्वत:पासून सुरवात केली पाहिजे. हे काय हिंदूत्व नाही. भाजप जो प्रचार करतंय ते काही हिंदूत्व नाही. त्यांचा प्रचार खरात बाबा सारखे लोकं करतात. एकीकडे लोकसंख्या नियंत्रीत ठेवा म्हणतात आणि दुसरीकडे अशा माध्यमातून लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करताय का? सैन्यासाठी एक मुलं द्या म्हटले असते तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते.
Source link
राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत