Headlines

राधा पाटीलचा लावणी कार्यक्रम वादात:परवानगी नाकारली; तरी दहीहंडीचा कार्यक्रम सुरूच, पुण्यात तिघांवर गुन्हा दाखल




दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात आवश्यक परवानगी न घेता लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमात अश्लील नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. असे असतानाही कार्यक्रम आयोजित केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी लावणी नृत्यांगना राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नंदलाल हरिचंद्र भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आवश्यक प्रमाणपत्रे सादर न केल्याने परवानगी नाकारली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजच्या वतीने राधा पाटील यांच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी मिळावी, यासाठी आयोजकांकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. मात्र, अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाशी संबंधित आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमातील सादरीकरण नियमांच्या चौकटीत आहे की नाही, यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. कार्यक्रमासाठी पोलिसांनी संबंधित आयोजकांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, आयोजक, मंडळाचे पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या राधा पाटील यांच्याकडून आवश्यक अधिकृत प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. परवानगी नसताना कार्यक्रम आयोजित करू नये, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली होती. तरीही कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी राधा पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरातील विविध मंडळांच्या कार्यक्रमांची पाहणी करण्यात येत होती. याचदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक गरड आणि त्यांच्या पथकाने दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भेट दिली. त्यावेळी संबंधित मंडळाकडून परवानगी नसतानाही मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समोर आले. कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल दरम्यान, राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओतील नृत्याच्या हावभावांवर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेप घेत अश्लीलतेचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांनी स्वतंत्रपणे काय निष्कर्ष काढला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या मुख्यतः आवश्यक परवानगी आणि प्रमाणपत्रे नसतानाही कार्यक्रम आयोजित केल्याच्या प्रकरणावरून कारवाई केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील कागदपत्रे, पोलिसांची पूर्वपरवानगी आणि संबंधित नियमांचे पालन झाले होते का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दहीहंडी उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याने मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानग्या घेणे आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय:मराठा विद्यार्थ्यांसाठी 4 महत्त्वाचे GR; OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती; मृतांच्या वारसांना नोकरी मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना राज्य सरकारच्या पातळीवर महत्त्वाच्या हालचालींना वेग आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा, कुणबी आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी चार महत्त्वाचे शासकीय आदेश जारी केले आहेत. शिक्षणातील सवलतींपासून वसतिगृह निर्वाह भत्ता, परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणापर्यंत या निर्णयांचा समावेश आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *