![]()
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात येथील सशक्त नारीशक्ती अकोला ग्रामीण मंडळ चोहट्टा यांच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संतोष शिवरकर, राजेश नागमते, योगेश गोतमारे, विठ्ठल वाकोडे, मधुकर फाटकर, किशोर सरोदे, गोपाल आमले, दत्ता गावंडे, ज्ञानेश्वर झामरे, माधुरी बगे, सुभाष घनबहादूर, राधेश्याम ताडे, मयूर चहाजगुणे, गोलू देंडव, अभी मंगळे आदींची उपस्थिती होती. महिलांच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चेकऱ्यांमधील राजेश नागमते म्हणाले की, महिला आरक्षण हे महिला व देशहिताचे आहे. महिलांच्या हितावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, गरज पडल्यास मोठे आंदोलन उभारणार, असा इशारा यावेळी माधुरी बघे यांनी दिला. दरम्यान महिला आरक्षणास विरोध करणाऱ्या पक्षांच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शाळेतील विद्यार्थीनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोर्चात सहभागी विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत महिलांसाठी हे विधेयक किती महत्वाचे असल्याचे पटवून दिले.
Source link
विरोधी पक्षांविरोधातील निषेध मोर्चास प्रतिसाद:महिला आरक्षण देश हिताचे असल्याचा संदेश