![]()
जोड्याजवळ बसून शाळा शिकणारा मुलगा आज शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. हा बहुजनांच्या संघर्षाचा विजय आहे. ही केवळ शरणकुमार लिंबाळे या व्यक्तीची निवड नाही. ज्या बहुजन समाजातून मी आलो, त्या समाजाचा, दलित चळवळीचा आणि डॉ. बाबासा
.
सामाजिक न्यायासाठी साहित्याच्या माध्यमातून गेल्या ४०-४५ वर्षांपासून केलेल्या संघर्षाची ही पावती आहे. साहित्यातूनच परिवर्तन शक्य आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जोड्याजवळ बसून शिकणारा विद्यार्थी आज साहित्य संमेलनाच्या सर्वोच्च पदावर पोहोचतो. हा समाजातील बदलाचा मोठा पुरावा आहे. आजही जातीय तणाव, भेदभाव आणि अत्याचाराच्या घटना घडतात. मात्र दलित साहित्यावर मराठी समाजाचे मोठे प्रेम आहे. बंदुका आणि मिसाइल विध्वंस करतात. लेखणी संस्कृती निर्माण करते. अणुबॉम्ब माणसे संपवतो. लेखणी महाकाव्य निर्माण करते. त्यामुळे परिवर्तनासाठी लेखणीची ताकद महत्त्वाची आहे. म्हणूनच बाबासाहेबांनीही लेखणीवरच प्रेम केले.
भाषेच्या भवितव्यावर भूमिका केली स्पष्ट
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लिंबाळे यांनी साहित्य, सामाजिक परिवर्तन, जातीय वास्तव आणि मराठी भाषेच्या भवितव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या निवडीमागे महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण आणि आयोजक संस्थेचे प्रमुख राजेश पांडे यांचे मोठे प्रयत्न आहेत. त्यांनी अनेकांशी संपर्क साधला. माझे काम समजून घेतले. प्रागतिक विचारांवरील माझी निष्ठा समजून घेतली. त्यामुळे ही निवड सहज झालेली नाही, असेही लिंबाळे यांनी सांगितले.
४०-४५ वर्षे केलेल्या संघर्षाची ही पावती
साहित्याच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी गेली ४०-४५ वर्षे केलेल्या संघर्षाची ही पावती आहे. त्यामुळे या निवडीकडे मी एका व्यक्तीचा विजय म्हणून पाहत नाही. उपेक्षितांच्या संघर्षाला आणि परिवर्तनाच्या विचारांना मिळालेली मान्यता म्हणून पाहतो. – शरणकुमार लिंबाळे, नियोजित साहित्य संमेलन अध्यक्ष
निवडीमागे महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण आणि आयोजक संस्थेचे प्रमुख राजेश पांडे यांचे प्रयत्न
सामाजिक न्यायासाठी साहित्याच्या माध्यमातून गेल्या ४०-४५ वर्षांपासून केलेल्या संघर्षाची ही पावती आहे. साहित्यातूनच परिवर्तन शक्य आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जोड्याजवळ बसून शिकणारा विद्यार्थी आज साहित्य संमेलनाच्या सर्वोच्च पदावर पोहोचतो. हा समाजातील बदलाचा मोठा पुरावा आहे. आजही जातीय तणाव, भेदभाव आणि अत्याचाराच्या घटना घडतात. मात्र दलित साहित्यावर मराठी समाजाचे मोठे प्रेम आहे. बंदुका आणि मिसाइल विध्वंस करतात. लेखणी संस्कृती निर्माण करते. अणुबॉम्ब माणसे संपवतो. लेखणी महाकाव्य निर्माण करते. त्यामुळे परिवर्तनासाठी लेखणीची ताकद महत्त्वाची आहे. म्हणूनच बाबासाहेबांनीही लेखणीवरच प्रेम केले.
या संमेलनाच्या निमित्ताने ‘विद्रोही’सारखी समांतर संमेलने, अध्यक्षपदावरील वाद, हेवेदावे नकोत. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषेच्या भवितव्याबाबत बोलताना ते म्हणाले, मराठी ही संतांपासून दलितांपर्यंतच्या साहित्याने समृद्ध झालेली अभिजात भाषा आहे. भाषेचे भविष्य नवोदित लेखकांच्या खांद्यावर असते. नव्या लेखकांमुळे भाषा टवटवीत राहते. लेखक हे संस्कृतीचे पहारेकरी आहेत. मराठी भाषा, संस्कृती आणि सामान्य माणसाच्या व्यथांशी प्रामाणिक राहून आम्ही तिच्या संवर्धनासाठी काम करत राहू.