Headlines

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांचा अखेर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’:उपनेते गोपीकिशन बाजाेरिया यांच्या कार्यपद्धतीवर केली नाराजी व्यक्त‎



शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आश्विन नवले यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. नवले यांनी राजीनामा पत्रात उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामाचे पत्र त्या

.

नवले यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की ‘साहेब, आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे जिल्ह्यात काम केले परंतु गोपीकिशन बाजोरिया सारख्या विचारहीन व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा’ ‘बाजोरिया’सारख्यांच्या दावणीला पक्ष बांधला गेला असल्याने आणखी काही कार्यकर्ते राजीनामे देण्याचे मार्गावर आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत नवले यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. दरम्यान, नवले यांच्या निर्णयावर कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींनी त्यांच्या निर्णयाला समर्थन देत ‘स्वाभिमानासाठी घेतलेला निर्णय योग्य’ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *