Headlines

शेअरमध्ये नफ्याचे आमिष; 15.50 लाखांना गंडवले:मेसेंजरचे बनावट अकाउंट तयार करून फसवले, संभाजीनगर घटना




शेअर बाजारात आयपीओ आणि शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ६० वर्षांच्या पर्यावरण सल्लागाराची १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, पर्यावरण सल्लागारांना सुरुवातीला फेसबुक मेसेंजरवर त्यांच्या एका मित्राच्या नावे तयार केलेल्या बोगस प्रोफाइलवरून संपर्क साधण्यात आला. प्रोफाइलवरील छायाचित्र ओळखीचे वाटल्याने तक्रारदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी त्यांना “Bright Future – 202” आणि नंतर “VIP 169” या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुप्समध्ये सान्वी वाधवा व इतर ॲडमिन्सकडून शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे मेसेज दिले जात होते. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना ‘stocks.sampro-vip.com’ या बनावट वेबसाइटवर नोंदणी करायला लावली व बँकेचे खाते लिंक करण्यास सांगितले. सुरुवातीला’ शेअर्समध्ये नफा होत असल्याचे भासवून त्यांच्याकडून बँक खात्यांमध्ये १७ लाख रुपये जमा करून घेतले. यातील केवळ १ लाख ५० हजार रुपये त्यांना परतावा दिला. १५ लाख ५० हजारांचा गंडा घातला. अॅनालिसिस: बँकिंग सिस्टिमचा गैरवापर सायबर गुन्हेगार इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर सेबी नोंदणीकृत असल्याचे भासवून बनावट ट्रेडिंग ग्रुप्स तयार करतात. पीडित व्यक्तीला ॲपमध्ये नफा दिसत असतो, मात्र पैसे काढण्याची वेळ येते, तेव्हा तांत्रिक कारणे सांगून पैसे अडवले जातात. अशा प्रकरणात फसवणुकीचे पैसे ज्या बँक खात्यांमध्ये जातात, तिथे बँकांच्या अंतर्गत व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असू शकतात. अनेकदा बँकेचे अंतर्गत कर्मचारी, डेटा सायबर गुन्हेगारांना पुरवतात. तसेच, निष्क्रिय खात्यांचा गैरवापर करून ग्राहकांच्या नकळत अनधिकृतपणे पैशांची देवाणघेवाण केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *