![]()
भूविज्ञान आणि खनिकर्म (गौण खनिज) विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. सुयोग अनिल जगताप (४१) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळला. शुक्रवारी सकाळी सिडकोएन-१ परिसरात हा प्रकार उघड झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा ‘व्हिसेरा’ राखून ठेवला आहे. हा नैसर्गिक मृत्यू असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जगताप यांचे मूळ कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे. संभाजीनगरमध्ये ते एन-१ भागात एका फ्लॅटमध्ये भाड्याने एकटेच राहत होते. त्यांच्याकडे घरकामासाठी एक तरुण रोज यात होता. गुरुवारी (२७ ऑगस्ट) या तरुणाला कामावर येणे शक्य नसल्याने त्याने डॉ. जगताप यांना फोन केला, मात्र त्यांनी कॉल उचलला नाही. शुक्रवारी सकाळी ७ वाजता तो तरुण नेहमीप्रमाणे कामावर पोहोचला. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने अनेकदा बेल वाजवली आणि दरवाजाही ठोठावला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरुणाने तातडीने एमआयडीसी सिडको पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. सहायक निरीक्षक सचिन वायाळ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडून पाहिले असता डॉ. जगताप मृतावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. १४ जिल्ह्यांचा डोलारा सांभाळणारे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय आहे. याच कार्यालयातून तब्बल १४ जिल्ह्यांचा कारभार चालवला जातो आणि डॉ. जगताप या अत्यंत महत्त्वाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
Source link
संभाजीनगरात खनिकर्म उपसंचालकांचा मृतदेह आढळला:व्हिसेरा राखून ठेवला; नैसर्गिक मृत्यूचा पोलिसांचा अंदाज, कारण मात्र अद्याप अस्पष्ट