Headlines

‘सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!:मामाच्या मुलीशी लग्नाच्या चर्चेवर छोटा पुढारी संतापला




मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर कायदेशीर बंदी घालता येईल का, या मुद्द्यावर सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे. रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे पुढील पिढीच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या प्रकरणात कायदा करण्याची शक्यता तपासण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बिग बॉस फेम आणि आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असलेला छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरोडे यानेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या भूमिकेवर उपरोधिक टीका करत त्याने तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. ‘सरकार उद्या म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!’ असा टोला त्याने लगावला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मामाच्या मुलीशी लग्नाच्या मुद्द्यावरून चर्चा गेल्या काही दिवसांपासून मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर कायदेशीर बंदी आणता येईल का, असा प्रश्न चर्चेत आला आहे. रक्ताच्या नात्यात विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या पुढील पिढीला काही आनुवंशिक आजारांचा धोका वाढू शकतो, अशी वैद्यकीय चिंता या चर्चेमागे आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करता येईल का, याबाबत केंद्र सरकारकडून भूमिका मागवली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर या विषयावर चर्चा सुरू झाली. काहींनी आरोग्याच्या दृष्टीने अशा विवाहांवर निर्बंध असावेत, अशी भूमिका मांडली, तर काहींनी विवाहविषयक वैयक्तिक आणि सामाजिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. याच चर्चेत आता घनःश्याम दरोडे याचीही भर पडली आहे. ‘सरकार आमच्या मागेच का लागलंय?’ घनःश्याम दरोडे याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने नेहमीच्या विनोदी आणि उपरोधिक शैलीत सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, ‘मला समजत नाही की सरकार आपल्या मागे का लागलं आहे. सरकार तरुण पोरांचा विचार करत नाही. रोजगाराचा प्रश्न बाजूला राहिला, आता सरकारने थेट या मुद्द्यावरच हात घातला आहे. तरुणांनीही याच सरकारला निवडून दिलं आहे. आता मामाच्या मुलीशी लग्न करू शकत नाही, असा नियम काढण्याची चर्चा सुरू झाली आहे.’ पुढे त्याने मामा-मामीच्या नात्याचा संदर्भ देत या निर्णयावर मिश्किल टिप्पणी केली. ‘आतापर्यंत मामीशी गोड गोड बोललो. आमच्या आईने मामावर प्रेम करायला शिकवलं होतं, तेही आता वाया गेलं. तरुण मुलांनी आता करायचं काय? शेवटची आशा मामा असतो. मामा नेहमी भाच्याचं चांगलंच करत असतो. आम्ही कायम मामा आणि मामीविषयी चांगलं बोलत आलो आहोत. आता काय करायचं?’ असा सवाल त्याने केला. देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल या व्हिडीओत घनःश्याम दरोडे याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. आगामी 2029 च्या निवडणुकीचा उल्लेख करत त्याने सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला 2029 मध्ये कमी मतं मिळावीत असं वाटतंय का? आतापर्यंत रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे होते. हे प्रश्न सोडवण्याऐवजी आता या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज काय पडली?’ अशा शब्दांत त्याने सरकारवर निशाणा साधला. तरुणांसमोरील बेरोजगारी, रोजगाराच्या संधी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखे अनेक मुद्दे प्रलंबित असताना लग्नाच्या विषयावर चर्चा सुरू झाल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, सरकारने आधी तरुणांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. ‘मामा जोमात, मामी जोमात; आमची युवा पिढी कोमात’ घनःश्यामने पुढे तरुणांच्या संभ्रमावर विनोदी शैलीत भाष्य केले. ‘आता आमच्यासारख्या तरुणांनी कुणासमोर आवाज उठवायचा? कुणासमोर लढाई करायची? शेवटचा पर्याय म्हणजे मामा. तुम्ही सांगितलं की मामाच्या मुलीसोबत लग्न करू शकत नाही, तर तरुण मुलांचं अवघड होईल. मामा जोमात, मामी जोमात, पण आमची युवा पिढी मात्र कोमात,’ अशी टिप्पणी त्याने केली. याशिवाय तरुणांना लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज यापैकी जो पर्याय मिळेल तो स्वीकारण्याचा सल्लाही त्याने आपल्या खास शैलीत दिला. या विषयावर बोलताना त्याने सरकारच्या संभाव्य निर्णयांची खिल्ली उडवत आणखी एक विधान केले. ‘सरकार काहीही करू शकते. उद्या सरकार म्हणेल की तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!’ असे तो म्हणाला. अखेरीस तरुणांनी मामामामीचा विचार डोक्यातून काढून टाकावा, असेही त्याने उपरोधिकपणे सांगितले. छोटा पुढारीच्या व्हिडीओची चर्चा घनःश्याम दरोडे याच्या या व्हिडीओतून त्याने मामाच्या मुलीशी विवाह करण्याच्या मुद्द्यावर आपली विनोदी प्रतिक्रिया दिली असली, तरी त्याने सरकारच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख करत त्याने या विषयाला राजकीय संदर्भ दिला आहे. त्याच्या मिश्किल विधानांमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला मुद्दा आणि त्यावर घनःश्याम दरोडे याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया या दोन वेगळ्या बाबी आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत केंद्र सरकारची भूमिका आणि पुढील निर्णय काय असतील, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा’:सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *