Headlines

रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा टाकल्याने 25 हजारांचा दंड:पुण्यातील बुधवार पेठेतील तपकीर गल्लीत ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेची कारवाई




सार्वजनिक रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्या ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम व्यावसायिकाला पुणे महापालिकेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुधवार पेठेतील तपकीर गल्ली येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई केली. तपकीर गल्ली परिसरात सुरू असलेल्या बांधकामातील राडारोडा नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्रमांक पाचचे उपायुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली २४ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या वेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, चंद्रवदन गायकवाड, आरोग्य निरीक्षक तौसीफ देशपांडे, कृष्णा अवघडे आणि मुकादम उपस्थित होते. शहरात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे राडारोडा किंवा कचरा टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने दिला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचराकुंडीचा वापर करावा तसेच शहर स्वच्छ ठेवण्यास पुणे मनपाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *