![]()
उदगीर येथील सीए श्याम कलानीने 2143 कोटी रुपये नियमबाह्यपणे विदेशात पाठवले. या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रे व बनावट पॅन कार्डद्वारे 16 कंपन्या कागदोपत्री स्थापन केल्या. त्या कंपन्यांद्वारे हा पैसा परदेशात पाठवला. गुन्ह्याचा सूत्रधार राजस्थानच्या विजयनगरचा आहे. आरोपींनी 58 बँकांमार्फत चीन, बँकॉक, अमेरिका, सिंगापूर, ब्रिटन या 5 देशांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार केले. ज्या कंपन्यांच्या नावाने पैसा परदेशात पाठवला गेला त्या कंपन्या पत्त्यावर नाहीत. तपास पथकांनी या कंपन्यांच्या उलाढालीची चौकशी केली. त्यात एक कंपनी वगळता इतरांची उलाढाल 1 ते 2 लाखांत असताना त्यांनी हजारो कोटी रुपये विदेशात पाठवल्याचे समोर आले. शिकाऊ सीएंचा वापर, त्यांचे प्रमाणपत्र घेतले राजस्थानमधील विजयनगरचा सीए विकास गोखरू सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्याला अटक केली आहे. सीएचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना गुन्ह्यात सहभागी करुन विदेशात पैसे पाठवण्यासाठी त्यांचे ‘सीबी’ प्रमाणपत्र मिळवण्यात आले, असे तपासात स्पष्ट झाले. विदेशात ज्या कंपन्यांकडे पैसे गेले त्यासुद्धा बनावट आरोपींनी परदेशात पैसे पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीयकृत बँकांचा वापर केला. या बँकांमार्फत 5 देशांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. भारतातून पैसे पाठवणाऱ्या कंपन्या संशयास्पद असल्याने, ज्या परदेशी कंपन्यांच्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग झाली, त्या बोगस असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सहा राज्यांमधील 58 बँकांद्वारे पैसे विदेशात महाराष्ट्रासह 6 राज्यांतील 58 बँकांचा पैसे पाठवण्यासाठी वापर झाला. यामध्ये एकट्या पुणे शहरातील 31 बँक शाखांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ चेन्नईतील 9, ठाणे-मुंबईतील 5, चंदीगडमधील 5, पंजाबमधील 4, बंगळुरूमधील 2, तर केरळ व इंदूरमधील प्रत्येकी एका बँक शाखेचा समावेश आहे.सीए श्याम कलानी, राजस्थानातील सीए विकास गोखरूसह तिघांना अटक करण्यात आली आहे. देशाच्या उत्तर भागापासून दक्षिणेपर्यंत गुन्ह्याचे धागे ज्या बोगस 16 कंपन्यांतून पैसे विदेशात गेले आहेत, त्या कंपन्यांची नोंद महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि तमिळनाडूत आढळली. त्यामुळे हे नेटवर्क देशभरात आहे. आता या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला, तसेच हा पैसा कोणत्या कामांसाठी वापरात आला. याचा तपास पथकांकडून सुरू आहे.
Source link
16बोगस कंपन्या अन् 58 बँकांद्वारे पाच देशांत नियमबाह्य पाठवले 2143कोटी:उदगीरचा सीए कलानीचे चीन, अमेरिका, ब्रिटन, बँकॉक, सिंगापुरात रॅकेट