कामगार दिनी विद्युत भवनामध्ये लाईनमनच्या पुतळ्याचे अनावरण:‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित
प्रतिनिधी| अकोला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्युत भवन येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे आयोजित…