Headlines

महाराष्ट्रात डिझेलसाठी रात्रभर पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची गर्दी:विदर्भ-मराठवाड्यात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; रोहित पवार यांचाही सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जळगाव आणि जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:सोलापूर मनपात भंगार चोरीनंतर मंडई कर्मचाऱ्यांची हातसफाई उघड, बंद 2 गाळ्यातून 15 मे रोजी जप्त केलेले 1 लाखाचे साहित्य कोंडवाड्यात लपवले

महापालिका गोदामातील अतिक्रमणविरोधी पथकाचे भंगार साहित्य चोरीचे प्रकरण चर्चेत असतानाच मंडई विभागातील कर्मचाऱ्यांनीही असेच कारनामे केल्याचे उघडकीसआले. मुरारजी पेठेतील महात्मा फुले मार्केटमधील (सुपर बझार) दोन बंद गाळेधारकांनी भाडे न भरल्याने त्यांचे साहित्य 15 मे रोजी जप्त करण्यात आले. ते नियमानुसार रेकॉर्डला नोंद करुन मनपाच्या गोदामात ठेवणे अपेक्षित होते. मात्र मंडई विभाग कर्मचाऱ्यांनी ते पोटफाडी चौकातील…

Read More

होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यावर भीक मागण्याची वेळ:नांदेडच्या तरुणावर मुंबईत हरवल्याने आली वेळ, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे मायेची ऊब

मुंबईतील मालाड परिसरात भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या नियमित पोलिस मोहिमेदरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. रस्त्यावर भटकताना आढळलेला एक तरुण प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या या तरुणाचा मालाड पोलिसांनी शोध घेऊन कुटुंबाशी संपर्क साधला आणि अखेर मालाड पोलिस ठाण्यात भावनिक पुनर्मिलन घडून आले. ही…

Read More

शिर्डीत ₹3 हजार कोटी रुपयांतून बनत आहे डिफेन्स हब:डिफेन्स ड्रोन आणि सूर्यास्त्र क्षेपणास्त्राचे हार्डवेअर बनवण्याची तयारी; राजनाथ सिंह आज उद्घाटन करणार

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात (पूर्वीचे अहमदनगर) असलेल्या शिर्डी साई मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर, राज्य कृषी विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर ‘शिर्डी डिफेन्स कॉम्प्लेक्स’ वेगाने आकार घेत आहे. येथे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मोठे-मोठे डोम उभे आहेत आणि इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित सरकारी-खाजगी कंपन्यांचे 100 हून अधिक प्रदर्शन स्टॉल लावले जात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ…

Read More

मराठवाड्यात शिवसेनेची कोंडी:विधान परिषदेच्या 4 पैकी 3 जागांवर भाजपचा, एकावर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मंत्री शिरसाट म्हणतात, समन्वय समिती निर्णय घेईल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेल्या छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत सध्या शिवसेनेची (शिंदे गट) मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर या जागांवर आपला दावा ठोकल्यामुळे शिंदेसेनेची अडचण झाली आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेतील सत्ता…

Read More

पाणी संकट, शेतीसमोरील आव्हानांसाठी शेतकरी उत्पादक संस्थाच शाश्वत ठरेल:करमाळ्यात वॉटर संस्थेचा दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रम उत्साहात‎

बदलते हवामान, पाण्याचे संकट आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) अधिक सक्षम व शाश्वत होण्याची गरज असल्याचा संदेश करमाळ्यात आयोजित दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रमातून देण्यात आला आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (व . कम्युनिटी आणि इकोसिस्टम रेझिलियन्स उभारण्यात एफपीओंची भूमिका या विषयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, एफपीओ, एफपीसी…

Read More

In Punjab too, there was a case of army spying through CCTV, live feed was being sent abroad

Marathi News National In Punjab Too, There Was A Case Of Army Spying Through CCTV, Live Feed Was Being Sent Abroad पठाणकोट4 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेशातील नोएडानंतर आता पंजाबमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लष्कराची हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पठाणकोटमध्ये पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने राष्ट्रीय महामार्ग-४४वरील पुलाजवळील…

Read More

वारकऱ्यांच्या रुपात विठ्ठल धावून आला:भीषण अपघातातून बचावल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली कृतज्ञता‎

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. म्हणूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज घटकांसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकऱ्यांच्या रुपात खरंच माझा विठ्ठल मला वाचवण्यासाठी धावून आला,” असे भावूक उद्गार मनसे नेते दिलीप…

Read More

नुकसान:आष्टी सिंचन योजनेच्या कालव्याला गळती, तेलंगवाडी शेतशिवारात लाखो लिटर पाणी, सात किमी निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका

उजनी धरणाचे पाणी माळरानावरील शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आष्टी उपसा सिंचन योजना राबवण्यात आली. या योजनेला २०- ३० वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील आष्टी उपसा सिंचन योजना डावा कालवा १ ते ७ येथे कॅनलला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर गळतीकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष…

Read More

करमाळा तालुक्यात 52,591 हेक्टरवर खरीप पेरणी:मका, तूर पेरणीत होणार वाढ, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची खोल नांगरणीसह मशागतीची कामे वेगाने सुरू‎

करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला . तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची…

Read More