Headlines

नीट पेपरफुटी; पुण्यात छावा संघटनेचे तीव्र आंदोलन:अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

पुण्यात नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मोटेगावकर आणि इतर आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली….

Read More

ओडिशामध्ये तरुण-तरुणीला भररस्त्यात काठ्यांनी मारहाण:हल्लाखोरांनी बाईक थांबवली, रस्त्यावर फरफटत नेले; मित्राला वाचवण्यासाठी समोर आली मुलगी

ओडिशातील बेरहामपूर शहरात रस्त्यावर भरदिवसा एका तरुणावर आणि त्याच्या मैत्रिणीवर लाठ्यांनी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तरुण आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरून जात होती. याच दरम्यान, बीजीपूर परिसरात काही लोकांनी त्यांची दुचाकी थांबवली. यानंतर तरुणाला रस्त्यावर ओढून लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. तरुणी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर झोपली. तरीही हल्लेखोर दोघांच्या…

Read More

पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर 18 लाखांचा अपहार:कमी व्याजाचे आमिष दाखवून आरोपीने दागिने परस्पर ठेवले तारण, गुन्हा दाखल

पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. कर्वेनगर भागात एका ग्राहकाचे दागिने ताब्यात घेऊन आरोपीने ते परस्पर दुसऱ्या कंपनीत तारण ठेवले. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद शरद पवार (वय ४६, रा. वारजे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Read More

पुणे क्राईम जगत:हज यात्रेच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक, ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; मोलकरणीकडून घरातच चोरी

पुणे शहरात स्वस्त दरात हज आणि उमरा यात्रेचे आमिष दाखवून ७० ते ८० गुंतवणूकदारांची २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन मालकांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेहजाद मोहम्मद इस्लाम शेख (वय ३४, रा. कोंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अमीर सरदार शेख (वय…

Read More

गेटवे ऑफ इंडियावरील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक!:मुंबई बँकेकडून आर्थिक मदत, मंत्री नितेश राणेंची प्रवीण दरेकरांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाला गती देण्यासाठी बोट धारकांना मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासंदर्भात मत्स्यव्यवसाय…

Read More

घटस्फोटाच्या घोषणेनंतर कान्सला पोहोचली मौनी रॉय:ब्लॅक ड्रेसमधील पहिला लूक समोर आला; चार दिवसांपूर्वी पती सूरजपासून वेगळी झाली

पती सूरज नांबियारपासून वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर बरोबर चार दिवसांनी अभिनेत्री मौनी रॉय कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचली आहे. 18 मे रोजी तिने इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिने यासोबत कॅप्शन लिहिले, ‘कान्स आणि अफरातफरी, बोंजूर’. कान्स 2026 मधील तिच्या पहिल्या लूकसाठी मौनी रॉयने क्लासिक आणि मॉडर्न स्टाइल निवडली. तिने पांढऱ्या हॉल्टर नेक…

Read More

CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार:पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही, भीतीचे वातावरण निर्माण करण्याची परवानगी नाही

भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील सर्व लोकांना शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी अडचण निर्माण करता येणार नाही. ते म्हणाले की, आंदोलनाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची किंवा भीतीचे वातावरण निर्माण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू…

Read More

रायबरेलीमध्ये राहुल गांधी म्हणाले- आर्थिक वादळ येणार आहे:खूप कठीण काळ येत आहे, ॲक्शन घेण्याऐवजी मोदीजी परदेशात गेले

काँग्रेस खासदार राहुल गांधी 2 दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रायबरेलीमध्ये राहुल म्हणाले- आता आर्थिक वादळ येणार आहे. पंतप्रधान मोदींनी अदानी आणि अंबानींसाठी जी आर्थिक रचना तयार केली आहे, ती कोसळून पडेल. याचा फटका सामान्य जनतेला बसेल. यूपीच्या जनतेला धक्का बसेल. खूप कठीण काळ येत आहे. ॲक्शन घेण्याऐवजी पंतप्रधान परदेश प्रवासाला जाऊ नका असे सांगत…

Read More

शिवराज मोटेगावकर शिक्षण क्षेत्रातील 'माफिया':लातूरमधील क्लासेस मालकाची सुपारी देऊन केली हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमध्ये अधिक घट्ट होताना दिसत आहेत. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. मात्र, आता या प्रकरणात एका जुन्या हत्या प्रकरणाची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवराज मोटेगावकर यांनीच सुपारी देऊन लातूरमधील ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासेसचे मालक…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणी:मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही अवाक्

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता या…

Read More