Headlines

SRT वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू:अंबाजोगाई येथील काळवीट साठवण तलावात पोहताना मृत्यूने गाठले

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, डॉक्टर अभिमन्यू तरकसे दररोज सकाळी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात होते. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी गेले….

Read More

Airtel Surpasses HDFC Bank, Becomes Indias 2nd Most Valued Company

मुंबई1 तासापूर्वी कॉपी लिंक भारती एअरटेलने 18 मे रोजी मार्केट कॅपच्या बाबतीत एचडीएफसी बँकेला मागे टाकून भारतातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली. व्यवहारादरम्यान एअरटेलच्या शेअर्समध्ये 2% पर्यंत वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे कंपनीचा शेअर ₹1,953.8 च्या पातळीवर पोहोचला. या वाढीमुळे एअरटेलचे एकूण मार्केट कॅप वाढून सुमारे ₹12 लाख कोटी झाले, तर एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ₹11.8…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला आता निवडणुकीचे चाणक्य:प्रशांत किशोर सांभाळणार पक्षाची रणनीती, अजितदादांच्या निधनानंतर 'डिझाईन बॉक्स' बाहेर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय धुमश्चक्रीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळासाठी एक अत्यंत मोठा आणि गेमचेंजर निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेशी करार संपल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस आता थेट देशातील सर्वात यशस्वी राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर (PK) यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवणार आहे. काल, १९ मे रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

Read More

1000+ Vehicles Stuck Amidst Protest Over Bishop Murder & Hostage Crisis

Marathi News National Manipur Highway Blocked: 1000+ Vehicles Stuck Amidst Protest Over Bishop Murder & Hostage Crisis इम्फाळ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरची जीवनवाहिनी मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग 2 गेल्या पाच दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. पंतप्रधानांना सादर केलेल्या मागणी पत्रावर कोणतीही प्रगती न झाल्याने आणि सेनापती येथून अपहरण केलेल्या 14 कुकी नागरिकांना सोडवण्यात सरकारला अपयश…

Read More

खरातची नाशिक रोड तुरुंगात रवानगी:कोठडीतून आज ईडी ताब्यात घेणार, जगदंबा पतसंस्था गैरव्यवहार, संस्थापक आवारेलाही न्यायालयीन कोठडी

सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित अशोक खरात आणि पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी (दि. १८) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने कडक बंदोबस्तात त्यांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांनी फेटाळून…

Read More

शेतकरी कर्जमाफीला पुन्हा ब्रेक?:विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारचा निर्णय अडकला; विलंब होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी कर्जमाफी योजना आता आणखी काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जून महिन्यापर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय होईल, असे संकेत दिले होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

सेवानिवृत्तीनंतर पैसे सुरक्षित ठेवण्यासाठीचे 5 सूत्र:अनेकदा ज्येष्ठ नागरिक त्यांची संपूर्ण ग्रॅच्युइटी, पीएफचे पैसे एकाच बँकेत ठेवतात, असे करू नका

नोकरीची 30-35 वर्षे… घाम गाळून कमावलेले पैसे आणि निवृत्तीनंतर मिळालेला पीएफ, ग्रॅच्युइटीचा एकरकमी निधी. बहुतेक ज्येष्ठ नागरिक धोका टाळण्यासाठी याला सर्वात सुरक्षित मानून बँकेच्या एफडी किंवा बचत खात्यात पूर्ण जमा करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुमची बँक संकटात आली किंवा बुडाली, तर तुमची किती रक्कम सुरक्षित आहे? आरबीआयची संस्था- डिपॉझिट इन्शुरन्स अँड…

Read More

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात- चंद्रशेखर बावनकुळे:म्हणाले- नागपुरात महायुतीकडे 75% मते, बिनविरोधसाठी प्रयत्न करणार

नागपूर विधान परिषदेची जागा ही बिनविरोध व्हावी या करता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. कारण नागपूरमध्ये 75 टक्केपेक्षा जास्त मते महायुतीकडे आहेत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्यामुळे राज्यभरात ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्या बिनविरोध केल्या पाहिजेत, त्याकरता आम्ही सर्वच जण पुढाकार घेणार आहोत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

Read More

कर्नाटकात दोन हत्तींच्या लढाईत महिलेचा मृत्यू-VIDEO:हत्तींना अंघोळ करताना पाहत होती, खाली दबली; मुलासह दोन लोक थोडक्यात बचावले

कर्नाटकातील कोडगू (कुर्ग) जिल्ह्यातील दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये सोमवारी दोन हत्तींच्या भांडणादरम्यान एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. एका हत्तीला धक्का लागल्याने तोल गेला आणि तो महिलेच्या अंगावर पडला. यामुळे महिला दबून मरण पावली. तर एक पुरुष आणि त्याच्या मांडीवरचे एक बाळ थोडक्यात बचावले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तमिळनाडूची रहिवासी असलेली तुळशी (३३) इतर पर्यटकांसोबत नदीकिनारी उभी राहून हत्तींना…

Read More

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक:50 म्हशी अन्‌ रेड्यांची सुटका, गुदमरून 2 जनावरांचा मृत्यू; वैजापूर-नाशिक महामार्गावर कारवाई

वैजापूर-नाशिक महामार्गावर रविवारी गोवंश आणि जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून पकडला. या कारवाईत कंटेनरमधून ५० म्हशी व रेड्यांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले असून, वाहनासह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, कंटेनरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबल्यामुळे गुदमरून दोन रेड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला….

Read More