नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभालीचे निर्देश:झोन २ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त नाईकांकडून पाहणी
प्रतिनिधी । अमरावती शहरातील नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभाल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध परिसरांची पाहणी केल्यानंतर दिले. शहरात सध्या नाले व लहान नाल्यांची स्वच्छता तसेच उद्यानांची देखभाल, दुरुस्ती, अतिक्रमणाची समस्या आ वासून उभी आहे. नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करीत…