हरभऱ्याचे वाढीव उद्दिष्टही संपले; शेतकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली:मार्केटिंग फेडरेशन कागदी घाेडे नाचवण्यात मानते धन्यता
प्रतिनिधी | अकोला नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीदराने शासकीय हरभरा खरेदीचे ५९ हजार मेट्रिक टनाचेही उद्दिष्ट संपले असून खरेदी प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. जिल्हा पणनकडून ३ हजार १६८ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असताना केवळ १ हजार १६४ शेतकऱ्यांचा हरभरा मोजण्यात आला. हरभरा खरेदीची अंतिम मुदत २९ मे करण्यात आली होती. मात्र वाढीव उद्दिष्टही संपल्याने खरेदीची…